मुंबई – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील घाट विभागात मंगळवारी राज्य परिवहन मंडळाची बस उलटल्याने किमान 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 56 प्रवासी होते अशी माहिती मिळाली आहे. ही बस मलकापूरहून बुलढाण्याकडे जात असताना सकाळी 9.45 च्या सुमारास हा अपघात झाला.
बस राजूर घाट विभागातून जात असताना तिचे ब्रेक निकामी झाले आणि एका वळणावर ही गाडी उलटली, या घटनेत किमान 10 प्रवासी जखमी झाले असून बाकीच्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात प्राणहानी झालेली नाही.