Wagholi News : कपाटात ठेवलेले दागिने, रोख रकमेची चोरी
Wagholi News : पुणे ग्रामीण व उपनगरांच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, वाघोली जवळील पेरणे येथील कदमवस्ती परिसरात घरफोडीची घटना समोर आली आहे.
Updated On:

Wagholi News : किचनकडील बेडरूमचा दरवाजा तोडून त्याद्वारे घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली ७० हजारांची रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असा १ लाख २४ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना पेरणे कदमवस्ती येथे घडली आहे. (Wagholi News)
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ६ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पहाटे पाच दरम्यान घडली. याबाबत काळूराम टूले यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Wagholi News)




