Smartphone Offer: मस्तच! तब्बल 35 हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय Samsung चा स्मार्टफोन, फीचर्स खूपच जबरदस्त

Samsung Galaxy S24+ 5G Offer: भारतीय बाजारात सॅमसंगच्या स्मार्टफोन्सला मोठी मागणी आहे. तुम्ही देखील या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 35 हजार रुपयांपेक्षा अधिक डिस्काउंट मिळत आहे. फोनचे फीचर्स व यावरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोनची किंमत
Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोनचे 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट भारतीय बाजारात 99,999 रुपये किंमतीत लाँच झाले होते. आता हे मॉडेल फ्लिपकार्टवर तब्बल 35 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. म्हणजेच डिस्काउंटनंतर फोनला 64,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, फोन खरेदी करताना Flipkart Axis Bank Credit Card ने पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅकचा फायदाही मिळेल. अशाप्रकारे फोन 61,749 रुपये किंमतीत उपलब्ध होईल.
फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यावर 36,050 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुम्ही जो फोन एक्सचेंज कराल, त्यावर अवलंबून आहे. फोनला ऑनेक्स ब्लॅक आणि कोबाल्ट वॉयलेट रंगात खरेदी करता येईल.
Samsung Galaxy S24+ 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung च्या या प्रीमियम डिव्हाइसमध्ये 6.7 इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. यामध्ये Exynos 2400 प्रोसेसरसह 12 जीबीपर्यंत रॅमचा सपोर्ट मिळतो.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर Samsung Galaxy S24+ 5G मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी, 10 मेगापिक्सल टेलिफोटो आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसरसह येणारा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4900mAh बॅटरी देण्यात मिळेल.





