Samsung Galaxy S26 Ultra: Samsung आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Galaxy S26 Ultra उद्या (दि. 25) भारतात लॉन्च करणार आहे. याच वेळी Galaxy S26 आणि Galaxy S26 Plus हे दोन फोनही सादर केले जाणार आहेत. लॉन्चपूर्वीच या फोनबाबत अनेक माहिती लीक झाली असून एका टेक यूट्यूबरने लॉन्चआधीच हा फोन विकत घेऊन त्याचे सर्व तपशील ‘X’ (ट्विटर) वर जाहीर केले आहेत. किंमत काय असेल? Samsung ने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, लीक झालेल्या माहितीनुसार 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹1,34,999 असू शकते. हा फोन Cobalt, Violet, White, Black आणि Sky Blue अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. स्पेसिफिकेशन्स – डिस्प्ले: Galaxy S26 Ultra मध्ये 6.9 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि कमाल ब्राइटनेस 3000 निट्स असेल. प्रोसेसर व मेमरी: हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरवर चालण्याची शक्यता आहे. त्यात 16GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज असेल. कॅमेरा: फोनमध्ये चार रियर कॅमेरे असतील — 200MP प्राइमरी सेंसर, 50MP पेरिस्कोप टेलिफोटो, 50MP अल्ट्रा वाइड आणि 10MP टेलिफोटो. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असेल. बॅटरी: फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल आणि 60W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.