वडिलांच्या डोळ्यादेखत सात वर्षाच्या मुलाचे अपहरण ; अपहरणकर्त्यांकडून २ कोटींच्या खंडणीची मागणी

Builders son kidnapped। राज्यातील छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कोटींच्या खंडणीसाठी एका बिल्डरच्या सात वर्षाच्या मुलाचे कारमधून अपहरण करण्यात आले. ही घटना मुलाच्या वडिलांच्या डोळ्यासमोरच घडली आहे. अत्यंत गजबजलेल्या भागातून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
चैतन्य तुपे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून, त्याचे वडील सुनील तुपे हे बिल्डर आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मधून अपहरण चैतन्यचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीस विभाग सतर्क झाला असून, चौकाचौकांत नाकाबंदी करण्यात आली आहे. कार आणि अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.
वडिलांच्या डोळ्यासमोर झाले अपहरण Builders son kidnapped।
चैतन्य हा वडिलांसोबत सायकल चालवत फिरत होता. सुनील तुपे हे चालताना काहीसे मागे पडले व सायकल चालवित चैतन्य पुढे निघून गेला. त्याचवेळी एक कार चैतन्यजवळ आली. कारमधील व्यक्तींनी चैतन्यला जवळ बोलावले. दार उघडून आतील व्यक्तींनी चैतन्यला कारमध्ये कोंबले. एका अपहरणकर्त्याने चैतन्यची सायकल रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवली, दुसरा अपहरणकर्ता कारच्या बाहेरच उभा होता. विजेच्या वेगाने दोघे कारमध्ये बसले आणि सुसाट वेगाने ते निघून गेले.
२ कोटींच्या खंडणीची मागणी Builders son kidnapped।
हा प्रकार सुनील तुपे यांच्या लक्षात येताच त्यांनी धावत त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कार निघून गेली होती. काही मिनिटातच सुनील तुपे यांना हिंदीतून संभाषण करणारा फोन आला. त्यातून त्यांना दोन कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकारानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्यासह गुन्हे शाखा आणि अख्खे शहर पोलिस दल चैतन्यच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले.
चैतन्य हा केंब्रीज शाळेचा विद्यार्थी असून, त्याला सायकल खेळताना पळविण्यात आले. त्याच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट असून डाव्या डोळ्याखाली जुन्या जखमेची खूण आहे.





