अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी
Updated On:

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्यावर्षी सरकारने गृहक्षेत्रासाठीच्या विविध योजनांना प्राधान्य दिले होते. त्याअनुषंगाने सरकारे अनेक घोषणा केल्या होत्या.
2022 पर्यंत शहरी भागात प्रत्येकाला घर देण्याची सरकारची मोहीम आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात 81 लाख घरांची घोषणा करण्यात आली होती. यंदा 1 कोटी 3 लाखांहून अधिक घरांना मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान, 32 लाख घरे बांधून तयार आहेत. तर 28 लाखांहून अधिक घरांचे वाटपही करण्यात आले आहे.





