‘किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर’ ; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2025 । अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. तसंच आमचा फोकस GYAN वर असल्याचं त्यांनी नमूद केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष ‘ग्यान’वर आहे. GYAN म्हणजे G – गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N – नारी शक्ती. अर्थमंत्री म्हणाल्या की, आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला आहे.
यावेळच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामनयांनी किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यांनी यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता, ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करणार असल्याचे म्हटले. 12.7 लाख मेट्रिक टन निर्मिती क्षमता, आसाममध्ये कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर
डाळी आणि खाद्यतेलात स्वयंपूर्णत्यासाठी तूर, अरहर आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी 6 वर्षांचे अभियान राबवणार असल्याचे म्हटले.
भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी, त्यांचा कार्यक्षम पुरवठा करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल. मकाना बोर्डची बिहारमध्ये स्थापना करणार त्यानुसार बोर्डाकडून मकाना उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे.





