SC/ST, मागासवर्गीय प्रथम उद्योजक महिलांसाठी मोठी घोषणा ; महिलांना मिळणार 2 कोटींपर्यंतचं कर्ज

Budget 2025 । अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. त्यासोबतच त्यांनी आजच्या अर्थसंकल्पातून SC/ST, मागासवर्गीय प्रथम उद्योजक महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
महिलांना 2 कोटींपर्यंतचं कर्ज देण्यात येणार Budget 2025 ।
अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पातून अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी खास योजना राबवणार असल्याचे म्हटले. त्या अंतर्गत एससी, एसटीच्या पाच लाख महिलांना उद्योजक बनवणार असल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी सरकारकडून या महिलांना 2 कोटींपर्यंतचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली.
#UnionBudget2025 | Finance Minister Nirmala Sitharaman says, “The fiscal deficit is estimated to be 4.4% of the GDP…” pic.twitter.com/UyCoogQ1TY
— ANI (@ANI) February 1, 2025
दर्जेदार मेड इन इंडिया खेळणी बनवण्यावर भर Budget 2025 ।
त्यासवोबतच देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी विकासासाठी खास योजना राबवणार असल्याचे म्हटले. तसेच भारताला खेळणी उत्पादनांचं जागतिक केंद्र बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खेळणी उद्योगांसाठी खास क्लस्टर बनवणार असून दर्जेदार मेड इन इंडिया खेळणी बनवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



