Budget 2021 : पोलाद उत्पादनांवर आयात करात सवलत
Updated On:

नवी दिल्ली – सध्या आर्थिक अडचणीत आलेल्या छोट्या व लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध पोलाद उत्पादनांवर आयात कर सवलत जाहींर केली आहे. पोलादांच्या विविध प्रकारांवरील आयात कर आता साडे सात टक्के या एकसमान दराने आकारण्यात येणार आहे.
31 मार्च 2022 पर्यंत स्क्रॅपच्या स्वरूपातील स्टीलच्या आयातवरील आयात शुल्क पुर्ण काढून टाकण्याची घोषणाहीं अर्थमंत्र्यांनी केली आहे. स्क्रॅपच्या स्वरूपातील तांब्याच्या आयात शुल्कातही पाच टक्क्यांवरून अडीच टक्के इतकी कपात करण्यात आली आहे.
या स्वरूपांचे धातू छोट्या व मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्याचे रिसायकलिंग केले जाते. स्टील स्क्रु आणि प्लास्टिक बिल्डरवेअरवरील करांमध्ये मात्र वाढ करण्यात आली असून ते प्रमाण 10 टक्क्यांवरून 15 टक्के इतके करण्यात आले आहे.





