Recharge Plan : फक्त 1 रुपयात 24 दिवस मोफत कॉलिंग आणि रोज 1GB डेटा; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर
Recharge Plan : BSNLचा ₹1 प्रीपेड FRC प्लॅन पुन्हा उपलब्ध. 24 दिवसांची वैधता, रोज 1GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएससह मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घ्या.

Recharge Plan : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) नवीन ग्राहकांसाठी ₹1 चा प्रीपेड प्लॅन पुन्हा उपलब्ध केला आहे. हा कंपनीचा फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) असून नवीन सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. हा प्लॅन देशभर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्लॅनमध्ये 24 दिवसांची सेवा वैधता मिळते. या काळात दररोज 1GB डेटा म्हणजे एकूण 24GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. म्हणजेच 24 दिवसांसाठी ग्राहकाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.
मात्र, हा प्लॅन ग्राहकाला केवळ एकदाच घेता येतो. पुन्हा या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास नवीन सिमकार्ड घ्यावे लागेल. त्यानंतर सेवा सुरू ठेवण्यासाठी BSNLच्या नियमित प्रीपेड प्लॅनमधून रिचार्ज करावे लागेल.
नवीन सिमकार्ड घेण्यासाठी ग्राहक ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा जवळच्या BSNL कार्यालय अथवा अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधू शकतात. BSNLने यापूर्वीही हा प्लॅन काही काळासाठी उपलब्ध केला होता. कंपनीच्या 4G सेवेकडे अधिक ग्राहक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे मानले जात आहे.





