कडाक्याची थंडी, सगळीकडे बर्फ…बीएसएफ जवानाने केले असे काम (Video)

Updated On:

हवामान कोणतेही असो, भारतीय सुरक्षा दलांचा उत्साह नेहमीच उंचावलेला असतो. प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे.या दरम्यान, बर्फाळ प्रदेशातून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जवानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, जवानाचा हा व्हिडिओ बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बीएसएफ जवान कडाक्याच्या थंडीत बर्फाळ भागात कसरत करताना दिसत आहे. कठीण परिस्थितीतही जवानाची चपळता आणि स्फुर्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

40 सेकंदात 47 पुश अप
व्हिडिओमध्ये, गोठवणाऱ्या थंडीत बीएसएफचा जवान बर्फाच्छादित भागात पुश अप करताना दिसत आहे. हा जवान अवघ्या 40 सेकंदात 47 पुश अप मारताना दिसून आला आहे. यावरून तुम्हाला सैनिकांच्या फिटनेस लेव्हलची कल्पना येऊ शकते.

बीएसएफने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले – 40 सेकंद 47 पुश अप्स! Fit India Challenge. ही व्हिडिओ क्लिप 31 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. कडाक्याच्या थंडीत जवानाने ज्या वेगाने पुश-अप केले त्याचे लोक कौतुक करत आहेत.

बीएसएफने याआधी आणखी एका जवानाचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो बर्फाळ भागात एका हाताने पुश-अप करताना दिसत आहे. त्याने हातात ग्लोव्हजही घातले नव्हते. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Amit Shah : अमित शाह सातार्‍याच्या लेकीला म्हणाले, "कोल्हापूर माझं सासर अन्..."; त्रिपुराच्या सीमेवरील 'त्या' प्रसंगाची जोरदार चर्चा

2026-06-08 00:15:08

Amit Shah : अमित शाह सातार्‍याच्या लेकीला म्हणाले, "कोल्हापूर माझं सासर अन्..."; त्रिपुराच्या सीमेवरील 'त्या' प्रसंगाची जोरदार चर्चा

Pahalgam Attack : चार दिवसांनंतरही बीएसएफ जवानाची सुटका नाही; पंजाब सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले होते ताब्यात

2025-04-27 18:47:31

Pahalgam Attack : चार दिवसांनंतरही बीएसएफ जवानाची सुटका नाही; पंजाब सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले होते ताब्यात

बालाकोट सेक्‍टरमधून बीएसएफ जवान बेपत्ता

2023-09-09 21:40:20

बालाकोट सेक्‍टरमधून बीएसएफ जवान बेपत्ता

भारतीय सीमेवर हेरॉईन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा नापाक प्रयत्न सुरुच; बीएसएफ जवानांनी केला गोळीबार

2022-12-19 16:26:00

भारतीय सीमेवर हेरॉईन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा नापाक प्रयत्न सुरुच; बीएसएफ जवानांनी केला गोळीबार

भयंकरच! बीएसएफच्या जवानाने सहकाऱ्याची केली हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या

2022-03-08 13:23:32

भयंकरच! बीएसएफच्या जवानाने सहकाऱ्याची केली हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या