Rajgurunagar News : पुण्यातील राजगुरुनगरमध्ये थरारक घटना! गाडीला कट मारल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला; ७०० टाके पडल्याची माहिती
Rajgurunagar News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajgurunagar News : गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगरमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Rajgurunagar News)
त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याची तीन बोटे तुटली असून एका हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. (Rajgurunagar News)
किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम करमारे याचा काही मुलांसोबत वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. (Rajgurunagar News)
हल्लेखोरांनी शिवमच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात त्याची तीन बोटे तुटली असून हाताला गंभीर इजा झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे. (Rajgurunagar News)
अल्पवयीन मुलांच्या हिंसक कृत्यांमुळे चिंता
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनाला कट लागण्यासारख्या किरकोळ कारणावरून एखाद्यावर जीवघेणा हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच पालकांनीही मुलांच्या वर्तनाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (Rajgurunagar News)




