‘भाऊ, तू तामिळनाडू कसा पोहोचशील?’ अभिनेत्री स्वरा भास्कराने कुणाल कामारासोबतचा फोटो केला शेअर

Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर हि अनेकदा तिने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडत असते. तिच्या काही पोस्ट अनेकांना खटकतात तर काहींना आवडतात. नुकतेच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
मंगळवारी संध्याकाळी अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्रामवरूने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत स्वरा स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही हसत आहेत. या फोटोला स्वराने कॅप्शनही दिले आहे.
View this post on Instagram
‘एकदा कोणीतरी विचारले होते, भाऊ, तू तामिळनाडू कसा पोहोचशील?’ कुणाल कामरा तुमच्यासमोर सादर करत आहे.’ या ओळी लिहून स्वराने पोस्ट शेअर केली आहे. पण यामुळे आता तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आधीच स्टँडअप कॅामेडियन कुणाला कामरा याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबणात्मक कवितेमुळे वादात सापडलेला आहे. यामुळे तिने पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फुडल्याचे बोलले जात आहे.
तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. हे प्रकरण थंडावले आहे, तेव्हा ते भडकवण्याची काय गरज आहे? असा सवाल एका नेटकऱ्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘त्या दोघांचे चेहरे पहा, आग्राचे लोक कुणाल कामराला शोधत आहेत.’
हेही वाचा : आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 5 दिवसांत कोटींची कमाई





