British Columbia on Bishnoi Gang । ब्रिटिश कोलंबियाचे पंतप्रधान डेव्हिड अॅबी यांनी कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारकडे लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई करण्याची मोठी मागणी केली आहे. त्यांनी बिश्नोई टोळीला कॅनडातील दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली आहे. “ज्यामुळे तपास संस्था या टोळीच्या वाढत्या खंडणी आणि गुन्ह्यांवर कारवाई करू शकतील” असे त्यांचे म्हणणे आहे. अॅबी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पत्र पाठवण्याची योजना आखत आहेत, ज्यामध्ये या टोळीला अधिकृतपणे दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली जाईल.” असे म्हटले आहे. सरे याठिकाणी आयोजित सार्वजनिक सुरक्षा मंचानंतर ही मागणी करण्यात आली, ज्याठिकाणी दक्षिण आशियाई व्यवसायांना लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांवर चर्चा करण्यात आली. ‘हे एक गंभीर पाऊल ‘ British Columbia on Bishnoi Gang । एका वृत्तववाहिनीशी बोलताना अॅबीचे यांनी, ‘हे एक गंभीर पाऊल आहे. हे पोलिसांना महत्त्वाच्या तपासात मदत करते. आम्ही या शिफारसी हलक्यात करत नाही आहोत, परंतु ही कृती लोकांचा न्यायव्यवस्थेवरील, आपल्या लोकशाहीवरील आणि समुदायाच्या सुरक्षिततेवरील विश्वास कमी करते, परंतु कायद्याच्या राज्यावरील जनतेचा विश्वास देखील नष्ट करते.’असे म्हटले आहे. अॅबी पुढे म्हणाले की,”काही प्रकरणांमध्ये, गोळीबार आणि जाळपोळीच्या घटनांसह खंडणीच्या धमक्या देखील नोंदवल्या गेल्या आहेत, ज्या केवळ कोलंबियामध्येच नव्हे तर एडमंटन आणि ब्रॅम्प्टनसह देशभरातील शहरांमध्ये घडत आहेत.” अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पुढे एबी बोलताना,”आरसीएमपी टास्क फोर्स आधीच खंडणीच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी सक्रिय आहे, परंतु पारंपारिक पोलिसिंग पद्धती या समस्येला प्रभावीपणे हाताळण्यासाठी पुरेशा नसतील. कॅनेडियन माध्यमांच्या मते, पंतप्रधान म्हणाले की लॉरेन्स बिश्नोई गँग ब्रिटिश कोलंबिया, अल्बर्टा आणि ओंटारियोमध्ये दक्षिण आशियाई समुदायाच्या सदस्यांविरुद्ध खंडणी आणि इतर गुन्ह्यांशी जोडलेली आहे. लॉरेन्स भारतीय तुरुंगात कैद British Columbia on Bishnoi Gang । दरम्यान, भारतात तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर असलेली लॉरेन्स बिश्नोई गँग अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडली गेली आहे. या टोळीवर भारतीय सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना खंडणीची धमकी देण्याचा आरोप आहे, ज्यामध्ये परदेशी कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंजाबमधील गँगस्टर बिश्नोई सध्या अहमदाबादमधील साबरमती मध्यवर्ती तुरुंगात बंद आहे. हेही वाचा अमेरिकन फेडचा निर्णय अन् पश्चिम आशियातील तणावामुळे बाजार मंदावला ; सेन्सेक्स १३० अंकांच्या तर निफ्टीही २४८०० च्या खाली