स्थलांतराच्या नावाखाली होणाऱ्या मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ब्रिटन, इटली, अल्बेनिया ‘कटीबद्ध’

रोम – युरोपात येणाऱ्या अनियंत्रित स्थलांतरितांच्या लोंढ्याला रोखण्याबाबत उपाययोजना करण्यास मध्ये सहमती झाली आहे. स्थलांतरणाच्या नावाखाली मानवी तस्करीला रोखण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला या तीन्ही देशांनी आपली वचनबद्धता दर्शवली आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांच्यात रोम येथे या मुद्यावर चर्चा झाली. उत्तर आफ्रिकेतून सागरी मार्गाने युरोपच्या किनारपट्टीवर येण्यासाठी स्थलांतरितांकडून या देशांनाच प्राधान्य दिले जात असते.
स्थलांतरितांना रोखण्यासाठी ब्रिटन आणि इटलीमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या आधीन राहून उपाय योजना करण्याचा निर्णय झाल्याचे जॉर्जिया मेलोनी यांच्या कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
स्थलांतरितांना रोखण्यासाठीच्या या प्रकल्पाला इटली आणि ब्रिटनचे सहप्रायोजकत्व असणार आहे. मेलोनी, सुनक आणि रामा यांनी एकत्रितपणे स्थलांतरिंना रोखण्याच्या उपाय योजनांसाठी एकमेकांना करायच्या सहकार्यामध्ये वाढ करण्याचे मान्य केले आहे.





