Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण प्रकरणात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. भारताची महिला ऑलिम्पियन मुष्टियुद्धपटू मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय देखरेख व चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती.
देशातील अनेक नामांकित महिला कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारकडून 23 जानेवारीला मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली.
ही समितीच सध्या कुस्ती महासंघाचे दैनंदिन कामकाज पाहत आहे. त्यांना ब्रिजभूषण यांची चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/its-australia-who-seal-their-place-in-sundays-t20worldcup-final/
मात्र, समिती सदस्यांच्या विनंतीनंतर त्यांना चौकशीसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली असून ते 9 मार्चला अहवाल सादर करतील. आघाडीच्या कुस्तीगिरांनी आंदोलन मागे घेतले असले, तरी त्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला नाही.





