Brij Bhushan Sharan Singh : उत्तर दाखल करण्यासाठी ब्रिजभूषण यांना अखेरची संधी; दिल्ली न्यायालयाचे निर्देश
दिल्ली न्यायालयाने बुधवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांना एका आठवड्याची अंतिम संधी दिली.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अपीलावर उत्तर दाखल करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने बुधवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांना एका आठवड्याची अंतिम संधी दिली.
विशेष न्यायाधीश दिग विनय सिंग यांनी ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या वकिलांना स्पष्ट केले की, उत्तर दाखल करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. वकिलांनी आणखी एका आठवड्याची मुदत मागितल्यानंतर न्यायालयाने विनंती मान्य केली. प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजीही न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानुसार बुधवारी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने सिंग, डब्ल्यूएफआयचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर आणि राज्य सरकारला नोटीस बजावली होती. चार महिला कुस्तीपटूंनी २५ सप्टेंबर रोजी फौजदारी अपील दाखल करून ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
यावर्षी ३ ऑगस्ट रोजी मॅजिस्ट्रेट न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे सिंग यांची निर्दोष मुक्तता केली होती. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेती विनेश फोगाट यांचाही समावेश आहे.
अपीलकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, निर्दोष मुक्ततेचा निर्णय पुराव्यांच्या चुकीच्या आणि निवडक मूल्यमापनावर आधारित आहे. तसेच, कायद्याची प्रस्थापित तत्त्वे योग्य प्रकारे लागू करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अपीलावर न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान (Brij Bhushan Sharan Singh) दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे.






