Bhushan Sharan Singh: मोठी बातमी! कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंग निर्दोष, पहिली प्रतिक्रिया आली समोर
Bhushan Sharan Singh:

Bhushan Sharan Singh: उत्तर प्रदेशातील कैसरंगजचे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी सिंग स्वतः कोर्टात हजर होते.
न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना मी केवळ न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी आलो असल्याचे सांगितले होते. माझ्या हातात काहीच नाही. या प्रकरणात विनोद तोमर यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सिंग यांच्या वकिलाने सांगितले की, “आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्या आधारे पुढील माहिती दिली जाईल. मात्र, दोन्ही आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.”
निर्णयानंतर काय म्हणाले ब्रिजभूषण शरण सिंह? Bhushan Sharan Singh:
या निर्णयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले, मी सुरुवातीपासूनच सांगितले होते की, माझ्यावरील आरोप सिद्ध झाले आणि न्यायालयाचा निर्णय माझ्याविरोधात आला तर मी स्वतःला फाशी देईन. आज न्यायालयाने माझी आणि विनोद तोमर यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. ही माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी आनंदाची बाब आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, आपण वयाच्या 15-16 वर्षापासून हा संघर्ष पाहत आलो आहोत आणि आपल्याला न्याय मिळेल यावर नेहमीच विश्वास होता. आपण कधीही स्वत:ला गुन्हेगार समजत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि आज न्यायालयाने त्यांना न्याय दिला आहे. आपण नेहमीच ज्युनियर खेळाडूंची लढाई लढत असल्याचा दावा ब्रिजभूषण यांनी केला. Bhushan Sharan Singh:
कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, या प्रकरणात अनेक मोठे राजकीय पक्षही पैलवानांच्या पाठीशी उभे राहिले होते. प्रियांका गांधीही त्यांच्या समर्थनार्थ आल्या होत्या, आम आदमी पक्षाचे लोकही अन्न-पाणी घेऊन आले होते आणि त्यांच्या मृत्यूची मागणीही करण्यात आली होती, असे ते म्हणाले.






