बिहारमध्ये पूल कोसळण्याचे सत्र सुरूच; आठवड्याभरातील तिसरी घटना समोर

Bridge Collapsed In Bihar| बिहारमध्ये आठवड्याभरात पूल कोसळण्याची तिसरी घटना समोर आली आहे. मोतिहारीमध्ये येथे ही घटना घडली आहे. दोन कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात येत होता. पुलाच्या कास्टिंगचे काम झाले होते. मात्र त्यादरम्यान हा पूल कोसळला. याआधी अररिया आणि सिवानमध्येही पूल कोसळले आहेत.
सिवानच्या महाराजगंज उपविभागातील पाटेधा आणि गरौली गावांदरम्यान गंडक कालव्यावरील पूल 12 जून रोजी अचानक कोसळला. तर 18 जून रोजी अररिया जिल्ह्यातील सिक्टी ब्लॉकमध्ये बाकरा नदीवर बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला होता.
तर आता पूर्व चंपारणच्या मोतिहारीच्या घोरासहन ब्लॉकमधील चैनपूर स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर पूल कोसळल्याची घटना घडली. या पुलाची लांबी सुमारे 50 फूट होती. घोरासहन ब्लॉक अमावा ते चैनपूर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कास्टिंगचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तलावाच्या काही भागाचे कास्टिंगही शनिवारी करण्यात आले. शनिवारी रात्री या पुलाचा सुमारे 40 फूट लांब भाग अचानक पडला. Bridge Collapsed In Bihar|
पुलामध्ये वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे अररियातील बाकरा नदीवर झालेल्या पुलाच्या दुर्घटनेप्रमाणेच येथेही असाच प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी लोकांनी पूल दुर्घटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. घोरासहन ब्लॉकच्या अमवा ते चैनपूर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर 40 फूट पूल बांधण्याचे काम सुरू असल्याचे ते सांगतात. Bridge Collapsed In Bihar|
कास्टिंगच्या काही तासांनंतर पूल कोसळला. धिरेंद्र कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आरसीसी पूल बांधण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणाची बिहार सरकारने चौकशी करून दोषींवर कारवाईकरण्याची देखील मागणी केली जात आहे. Bridge Collapsed In Bihar|
सिवानमध्येही पूल कोसळला
तर बिहारच्या सिवानमध्येही पूल कोसळल्याची घटना घडली होती. येथे महाराजगंज-दरोंडा विधानसभेच्या सीमेला जोडणाऱ्या पुल कमकुवत झाला आणि कोसळला असल्याचे लोकांनी सांगितले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
180 मीटर लांबीचा नवीन बांधलेला पूल कोसळला
तर मंगळवारी अररियामध्ये सुमारे 180 मीटर लांबीचा नवीन बांधलेला पूल कोसळला होता. हा पूल अररियातील सिक्टी येथील बाकरा नदीवर बांधण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन होणार होते, मात्र त्यापूर्वीच हा पूल कोसळला. सिक्टी ब्लॉकमध्ये असलेल्या बाकरा नदीवर 12 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा:





