Brent crude prices fell: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत दिलासा; ब्रेंट क्रूड 11 टक्क्यांनी घसरले
Brent Crude Prices Fell:

Brent Crude Prices Fell: अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य तोडगा निघण्याच्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 11 टक्क्यांहून अधिक घसरून प्रति बॅरल 8,588 रुपयांवर आल्या.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), 12,132 लॉट्सच्या उलाढालीत, मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठीच्या कच्च्या तेलाच्या किमती 1,110 रुपयांनी, म्हणजेच 11.45 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 8,588 रुपयांवर आल्या.
त्याचप्रमाणे, जून महिन्याच्या कराराच्या किमतीदेखील 4,274 लॉट्समध्ये 1,098 रुपयांनी, म्हणजेच 11.69 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 8,298 रुपयांवर आल्या.
अमेरीका व इराण संघर्ष संपवण्यासाठी आणि व्यापक अणुवाटाघाटींचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने एका प्राथमिक कराराच्या जवळ पोहोचले असल्याच्या वृत्तांनंतर तेलाच्या किमतींवर परिणाम झाला.
प्रस्तावित आराखड्यात निर्बंधांमध्ये सूट आणि गोठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या इराणी निधीच्या सुटकेच्या बदल्यात इराणच्या अणुसंवर्धनावर तात्पुरती बंदी, तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणार्या जलवाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्याचा समावेश असल्याचे म्हटले जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट तेलाची किंमत 11.57 डॉलर्सने, म्हणजेच 10.53 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 98.30 डॉलर्सवर आली. ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजने म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटींना पुढे जाण्यासाठी होर्मुझ सुरक्षा मोहीम तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आणि युद्धविराम कायम असल्याची पुष्टी केल्यामुळे भू-राजकीय जोखीम प्रीमियम कमी झाला.





