Breaking News | Bird Flu in Maharashtra : राज्यात ‘बर्ड फ्लू’ पाय पसरु लागला ! ‘या’ जिल्ह्यात आढळल्या मृत कोंबड्या, परिसरात हाय अलर्ट

Breaking News | Bird Flu in Maharashtra : लातूरमधील उदगीर शहरात मागील काही दिवसांमध्ये अचानक अनेक कावळे मरून पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या कावळ्यांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लूचा (Bird Flu) संसर्ग कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच लातूर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील १० किलोमीटर क्षेत्र ‘अलर्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला. या अलर्ट झोनमधील कुक्कुटपालन केल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे सर्वेक्षण केले असून वैद्यकीय नमुने देखील संकलित करण्यात आले होते.
उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’च्या (Bird Flu) विषाणूजन्य आजाराने झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले होते. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या होत्या.
लातूर शहरानंतर आता नांदेडच्या किवळा येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. यामुळे अनेक कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली आहेत.
पशू संवर्धन विभागाने या संदर्भात संरक्षणात्मक उपाययोजना सूरू केल्या आहेत. अद्याप या बर्ड फ्ल्यूचा मानवाला संसर्ग झाला नसल्याने बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा आणि गैरसमज पसरवू येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील किवळा येथे मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामूळे पशू संवर्धन विभागाकडून तातडीने उपाययोजना सूरू केल्या आहेत. कीवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्यांची 20 पिल्ले मृतावस्थेत आढळले होती.
पशुसंवर्धन विभागाने या मृत कुकुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून हे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मृत कुकुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कोंबड्यांची पिल्ले पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे. आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी किवळा येथील दहा किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे. तसेच प्रशासनाने देखील सावधगिरी बाळगण्याचे निदर्शने दिले आहेत.
#लातूर जिल्ह्यातील #उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय व पाण्याच्या टाकीचा परिसर ‘दक्षता क्षेत्र’ घोषित
📍उदगीरातील मृत कावळ्यांना AVIAN INFLUENZA H5N1 (बर्ड फ्लू) : भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल.परिसर निर्जंतुकीकरणास प्राधान्य.#H5N1 pic.twitter.com/r6XOpf1iVU— Divisional Information Office, Latur (@InfoDivLatur) January 19, 2025





