“ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची बदलू शकते रिलीज डेट

मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपट अनाउंसमेंट झाल्यापासूनच कायम चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून त्याला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. हा चित्रपट डिसेंबर मध्ये रिलीज होणार होता मात्र या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
याबाबत आलियाने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती सांगितले, हा चित्रपट एक वेगळ्या प्रॉजेक्ट आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता आहे, कारण या चित्रपटाची शूटिंग बुल्गारियासह, लंदन, न्यू यॉर्क, स्कॉटलैंड आणि वाराणसी येथे होणार आहे त्यामुळे शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आला. तसेच चांगल्या गोष्टी नेहमीच वेळ घेतात. दरम्यान, या चित्रपटामध्ये किंग खान म्हणजे शाहरुख खानही या चित्रपटात स्पेशल अरपीयरेंस म्हणून काम करत आहे.
याचे कामही शाहरुखने सुरु केल्याची समजते. रणबीर आणि आलियासह “ब्रह्मास्त्र’मध्ये या दोघा कलाकारांसह मोठी फौज आहे.
यात अमिताभ बच्चन आणि साउथ इंडियन सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन महत्तवाची भूमिका साकारत आहे. तसेच अयान मुखर्जीच्या या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय ही झळणार आहेत.





