Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?
Janhvi Kapoor अंशुला कपूरच्या लग्न आणि रिसेप्शन सोहळ्यात जान्हवी कपूरने सुंदर पारंपरिक लूकमध्ये उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये ती हातावरील मेहंदी दाखवताना दिसते. या मेहंदीमध्ये शिखर पहाडिया याचे नाव 'शिक्खू' असे लिहिलेले दिसते.

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती शिखर पहाडिया याला डेट करत असून दोघे अनेकदा एकत्र दिसतात. आता पुन्हा एकदा जान्हवीने आपल्या प्रेमाची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. बहिण अंशुला कपूरच्या लग्नातील मेहंदीमध्ये तिने शिखरचे नाव लिहून घेतल्यामुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगली आहे.
अंशुला कपूरच्या लग्न आणि रिसेप्शन सोहळ्यात जान्हवी कपूरने सुंदर पारंपरिक लूकमध्ये उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये ती हातावरील मेहंदी दाखवताना दिसते. या मेहंदीमध्ये शिखर पहाडिया याचे नाव ‘शिक्खू’ असे लिहिलेले दिसते. हे पाहताच चाहत्यांचे लक्ष या फोटोवर गेले. (Janhvi Kapoor)

Janhvi Kapoor
विशेष म्हणजे, जान्हवी शिखरला प्रेमाने ‘शिक्खू’ या टोपणनावाने हाक मारते. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात तिने स्वतः याचा खुलासा केला होता. इतकेच नाही, तर तिने मोबाईलमध्येही शिखरचा नंबर ‘शिक्खू’ या नावाने सेव्ह केल्याचे सांगितले होते. त्यामुळे मेहंदीमध्ये हेच नाव पाहून चाहत्यांना तिच्या नात्याची आणखी एक गोड झलक पाहायला मिळाली. (Janhvi Kapoor)
जान्हवीने शिखरवरील प्रेम अशा प्रकारे व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिने शिखरच्या नावाचे लॉकेट घातले होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तसेच दोघे अनेकदा सुट्ट्यांमध्ये एकत्र फिरताना दिसतात. धार्मिक स्थळांना भेट देतानाही त्यांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे दोघांचे नाते आता कोणापासूनही लपून राहिलेले नाही. (Janhvi Kapoor)
जान्हवीच्या या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आणि शिखरच्या नात्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी “आता लग्नाची तयारी सुरू झाली का?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. मेहंदीत प्रियकराचे नाव लिहिण्याची परंपरा अनेक ठिकाणी लग्नाशी जोडली जाते. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे. मात्र, जान्हवी किंवा शिखर यांनी अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘लग जा गले’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ‘मिस्टर लेले’ हा चित्रपटही तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये आहे. तसेच ‘तुंबाड’ चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यासोबत एका हॉरर-थ्रिलर चित्रपटात ती काम करणार असल्याचीही चर्चा आहे.
जान्हवीचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट ‘पेद्दी’ होता. या चित्रपटात तिच्यासोबत दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता तिच्या आगामी चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





