Mustafa Hajrulahovic Memorial Boxing Tournament : मंजू राणीचे सुवर्ण यश; भारताला एकूण दहा पदकं..

नवी दिल्ली :- मुस्तफा हजरुलाओवीक स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल 10 पदकांना गवसणी घातली. त्यातही स्टार महिला मुष्टियुद्ध खेळाडू मंजू राणीने सुवर्णपदकाची कमाई केली.
मंजू व्यतरीक्त भारताच्या अन्य खेळाडूंनीही पदके मिळवली. 50 किलो वजनी गटात महिला विभागात मंजूने अफगाणिस्तानच्या सादीया ब्रोमांड हिचा 3-0 असा पराभव केला. तिने या कामगिरीमुळे पदक तर मिळवलेच मात्र, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मनही मिळवला.
51 किलो गटात बरुन सिंग शागोलशेम याने पोलंडच्या जॅकब स्लोमीन्सकचा 3-0 असा पराभाव करत केला. 57 किलो वजनी गटात अक्षय कुमारने स्वीडनच्या हल्डी हाड्रोसवर 2-1 अशी मात केली. 91 किलो वजनी गटात नवीन कुमारने पोलंडच्या माटेईझ बेरेनिस्कीवर 2-1 असा विजय मिळवला.
63 किलो वजनी गटात मनिश कौशिकने पॅलेस्टिनच्या महंमद सोद याचा 3-0 असा पराभव केला. ज्योती, शशी, जिग्यासा, विनाक्शी आणि सतिश कुमार यांना प्रतिस्पर्धी खेळाडू आले नाहीत म्हणून विजयी घोषित केले गेले. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनीच आपले वर्चस्व राखले.





