Morne Morkel Statement : वैभवचे पदार्पण होणार की सॅमसनला आणखी संधी मिळणार? दुसऱ्या सामन्यापूर्वी बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलने केलं स्पष्ट
Morne Morkel Statement : दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Morne Morkel Statement On Vaibhav Sooryavanshi and Sanju Samson : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट संकेत दिले आहेत की, १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी जरी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असला, तरी संघ व्यवस्थापन सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना इतक्यात सहजासहजी बाहेर करणार नाही. इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेत अभिषेकने गेल्या तीन डावांत एक अर्धशतक आणि ४९ धावांची खेळी केली आहे, तर संजू सॅमसनने ५, ० आणि १ अशी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.
संजू-अभिषेकबाबत मॉर्केल काय म्हणाले?
शनिवारी (४ जुलै) होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मॉर्केल म्हणाले, “आपल्याकडे अभिषेक शर्माच्या रूपाने टी-२० क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच संजू सॅमसन हा विश्वविजेत्या (टी-२० वर्ल्ड कप) भारतीय संघाचा भाग राहिला असून आयपीएलमध्येही त्याचे प्रदर्शन अप्रतिम होते. त्यामुळे कोचिंग स्टाफ म्हणून आमच्या खेळाडूंवर विश्वास दाखवणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य आहे. एक युवा खेळाडू (वैभव) संधीची वाट पाहत आहे हे आनंददायी आहे, पण आम्ही फक्त बदलासाठी खेळाडूंना त्यांच्या नैसर्गिक जागेवरून हटवू शकत नाही.”
Morne Morkel about Vaibhav Sooryavanshi’s debut
I think we also need to respect the fact that we got number 1 T20 batter and pott of T20 World Cup pic.twitter.com/Lpo20GMuXd
— Sawai96 (@Aspirant_9457) July 3, 2026
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, खेळाडूंचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे फक्त सोशल मीडियावरील चर्चांमुळे ‘चला, सूर्यवंशीला खेळवून टाकूया’ असा निर्णय घेणे इतके सोपे नसते. वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची कोणतीही निश्चित वेळ सांगण्यास मॉर्केल यांनी नकार दिला. मात्र, या १५ वर्षीय मुलाने भारतीय ड्रेसिंग रूमच्या वातावरणात स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सामावून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
१५ वर्षांच्या वैभवचे मॉर्केलने केले कौतुक –
मॉर्केल म्हणाले, “वैभवने संघात खूप छान पद्धतीने जुळवून घेतले आहे. खेळाडूंच्या इन्स्टाग्रामवर तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर वयाच्या १५ व्या वर्षी भारतीय संघाच्या नेट्समध्ये सराव करणे कोणत्याही मुलासाठी प्रचंड दडपणाचे असू शकते. मात्र, नेट्समधील सत्रांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने आम्हा सर्वांना अत्यंत प्रभावित केले आहे. जेव्हा कधी त्याला संधी मिळेल, तेव्हा तो पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज असेल, याची मला खात्री आहे.”





