Nagar : गोवंशिय जनावरे सांभाळण्यासाठी गो शाळेत जमा

राहुरी : शहरातील खाटीक गल्ली परिसरामध्ये गोवंश जातीचे मांस विक्री होत आहे तसेच काही गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आहेत, अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथक खात्री करण्यासाठी रवाना केले असता खाटीक गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचे गोमांस विक्रीसाठी आढळले नाही.
परंतु त्या ठिकाणी पाच गोवंशीय वासरे फिरताना आढळून आली. त्यांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता कुणीही माहिती दिली नाही.
त्यामुळे राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना कळविले. त्यांनी स्वच्छता निरीक्षक राजेंद्र पवार, मुकादम सचिन वावरे, सफाई कामगार प्रसाद लाहुंडे, संतोष वावरे, सागर जगधने, सोमनाथ गायकवाड, निखिलेश वाघ यांना गोवंशिय वासरे हे एका वाहनांमध्ये आणून त्याबाबत सविस्तर कारवाई करून गोशाळा येथे रवाना करण्यात केली.
जनावरे कोणी आणि कशासाठी आणली होती, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक करत आहे.





