Uddhav Thackeray : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा पहिला टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात जरी महायुती सरकार सत्तेवर असले तरी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत. या तिन्ही पक्षांतील नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय हा तेथील परिस्थिती पाहून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता हा निर्णय स्थानिक नेत्यांकडून सोपविण्यात आला आहे. कोकणातही राजकीय फड चांगलाच तापू लागला आहे. हाचलालींना मोठा वेग आला असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी बैठकांचे सत्र पार पडत आहे. अशीच एक बैठक दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच झाली होती. या बैठकीत कणकवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी इतर पक्षांनी एकत्र येणे महत्वाचे असल्याने दोन्ही शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. पण यावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव; काय निर्णय होणार? कणकवली शहरात गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा झाली होती. त्यानुसार सिंधूदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंबंधीच्या प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘शहर विकास आघाडी’ म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. त्यामुळे कोकणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी, अद्याप याबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणाताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिंदेंसेनेसोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरपंचायत निवडणुकीसाठी जाणार का? त्या संबंधीचा काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Pune : मुंढवा-केशवनगर मोठे फेरबदल; प्रभाग क्र. १४ आणि १५ मध्ये आरक्षणाची स्थिती