बारामती : कृषी 2026 प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेते शनिवारी बारामतीत आहेत. या नेते मंडळींनी एकत्रितपणे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार झटका बसल्यानंतर शनिवारी बारामतीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदींची उपस्थिती होती. कृषी प्रदर्शनाच्या पाहणीनंतर या नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर बारामतीत शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य नेते मंडळींची महत्त्वाची पत्रकार परिषद सुद्धा पार पडत आहे.