Border 2 । Diljit Dosanjh : बॉलिवूड मधील अत्यंत प्रतीक्षेत असलेला चित्रपट ‘बॉर्डर 2’ सध्या जोरदार चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत अभिनेता दिलजीत दोसांझने मोठी अपडेट दिली आहे. दिलजीतने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये तो वरुण धवन, अहान शेट्टी यांना लाडू भरवत गळाभेट घेताना दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये तो सेटवरील क्रू मेंबर्सचेही आभार मानताना दिसत आहे. बॉर्डर 2 चं शूटिंग पूर्ण : दिलजीत दोसांझ सध्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात शहीद निर्मलजीत सिंह सेखों यांची भूमिका साकारत आहेत. त्यांनी शूटिंग पूर्ण झाल्याचं जाहीर करत व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये लहान मुलांसोबत आणि चित्रपटाच्या टीमसोबत ते मिठाई वाटताना दिसतात. विशेष म्हणजे पार्श्वभूमीत 1997 मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटातील प्रसिद्ध गीत ‘संदेशे आते हैं’ वाजत आहे. दिलजीतच्या पोस्टमध्ये काय आहे? व्हिडीओसोबत दिलजीतने लिहिलं,”बॉर्डर 2 चं शूटिंग संपलं. या चित्रपटात शहीद निर्मलजीत सिंह सेखों जी यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली.” या पोस्टवर अभिनेता वरुण धवननं देखील मजेशीर कमेंट केली. “पाजी, एक शॉट बाकी आहे, अनुराग बोलवत आहेत!” चित्रपट कधी प्रदर्शित होतोय? अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता आहेत. अहान शेट्टीचं खास कौतुक: ‘बॉर्डर 2’ मधील दुसऱ्या प्रमुख कलाकारांपैकी एक अहान शेट्टीनं देखील दिलजीतसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यांनी दिलजीतचं मनापासून आभार मानत लिहिलं, “दिलजीत पाजी, आपली पहिली भेट होती पण असं वाटलंच नाही. तुमची उर्जा, नम्रता आणि प्रेमळ वागण्याने सेटवरच वातावरणच बदलून गेलं. तुम्ही नेहमी असंच हसत राहावं, यासाठी मी प्रार्थना करतो. ‘बॉर्डर 2’ चा उत्साह सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.