नगर । पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा- आमदार संग्राम जगताप

नगर- सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप व शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्यावतीने कानडे राबवित असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि कानडे यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, डॉ. किशोर धनवटे, सुभाष सोनवणे, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. कानडे यांनी विविध शाळा, महाविद्यालयात व सार्वजनिक वाचनालय, शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोफत पुस्तके भेट उपक्रम राबविला आहे.




