Sridevi: श्रीदेवीचा सुंदर फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी लिहिला खास संदेश…

Sridevi: निर्माते बोनी कपूर यांनी आज त्यांच्या दिवंगत पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा एक फोटो शेअर केला आहे. आणि त्यासोबत एक खास संदेशही लिहिला आहे. त्यांनी श्रीदेवीचा एक जुना सुंदर फोटो शेअर केला असून, त्या फोटोसोबत ‘इंडियन ब्युटी’ असा भावनिक संदेश लिहिला आहे.
ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिने देखील ही पोस्ट लाइक केली आहे.
पारंपरिक लुकमध्ये श्रीदेवी
या फोटोमध्ये श्रीदेवी दक्षिण भारताच्या पारंपरिक पोशाखात असून तिच्या चेहऱ्यावर मोहक हास्य आहे. चाहत्यांनी या फोटोला भरभरून प्रेम दिलं आहे. एका चाहत्याने लिहिलं, “कोणीही त्यांच्या सारखं नव्हतं आणि होणारही नाही.” दुसऱ्याने लिहिलं, “तुम्ही जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, माझी फक्त हीच इच्छा आहे.”
View this post on Instagram
श्रीदेवीचं प्रेरणादायी अस्तित्व
माध्यमातील वृत्तांनुसार, बोनी कपूर यांनी अलीकडेच कोणतेही जिम न करता तब्बल 26 किलो वजन कमी केलं आहे. आपल्या या परिवर्तनाचं श्रेय त्यांनी श्रीदेवींना दिलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, श्रीदेवी यांनी नेहमी त्यांना आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी बोनी यांनी रात्रीचं जेवण सोडून फक्त सूप पिणं, नाश्त्यात फळांचा ज्यूस आणि ज्वारीची भाकरी खाणं यासारख्या सवयी अंगीकारल्या.
श्रीदेवीचं सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्व आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. बोनी कपूर यांची पोस्ट हेच अधोरेखित करते की, प्रेम आठवणींच्या रूपात कायम राहतं आणि त्या आठवणी काळजाला भिडणाऱ्या असतात.





