Entertainment : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनांतर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची लहान बहीण खूशी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जान्हवी आणि खुशी यांना देखील आई प्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करायचं आहे. याच दरम्यान, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली आणि वडील चर्चेत आले आहेत. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार अपार्टमेंट्स विकले आहेत. चारही अपार्टमेंट्स अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरातील आहेत.
बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी त्यांचे 4 फ्लॅट्सट विकल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. चार अपार्टमेंटपैकी एक सिद्धार्थ नारायण आणि अंजू नारायण यांनी घेतला आहे. हा फ्लॅट 1870 स्क्वेअर फीटचा आहे. तर मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांनी 1614 स्क्वेअर फीटचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि खुशीने बांद्रा येथे 65 कोटींना घर खरेदी केलं. हे घर 8669 स्क्वेअर फीटचं आहे. यामध्ये एक मोठं गार्डन, स्वीमिंग पूल आणि पार्किंगचाही समावेश आहे. हे 4 फ्लॅट्स 12 कोटींना विकले आहेत.
दरम्यान, जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन स्टारर ‘बवाल’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जान्हवी लवकरच ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याचे म्हंटले जात आहे. तिने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तर, खुशी कपूर झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.