पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; एकाला अटक

Bomb threat । मागच्या काही दिवसापासून देशात शाळा,दवाखाने बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात पाहायला मिळाली. कारण पुण्यासह सांगली, मिरज, सोलापूर आणि कोल्हापूरची रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन सांगली पोलिसांना करण्यात आला होता. त्यामुळे या स्थानकांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत लगेच आरोपीला अटक केली.
पाच रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी Bomb threat ।
पुण्यासह सांगली, मिरज, सोलापूर आणि कोल्हापूरची रेल्वे रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा सचिन मारुती शिंदे नावाचा आरोपी सातारा जिल्ह्यातला आहे. फलटन तालुक्यातील तरडगावचा तो रहिवासी आहे.
दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहर पोलिसांनी मुंबी लोहमार्ग पोलिसांची मदत घेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून अटक केले.
धमकीच्या फोनने यंत्रणा सतर्क Bomb threat ।
सुरुवातील हा धमकीचा फोन मॉकड्रिल असल्याचा समज पोलिसांना झाला होता. मात्र, नंतर, धमकीचा फोन खरोखरच आलेला होता अशी माहिती समोर आली. त्यानंतर सांगली पोलिसांनी पूर्ण क्षमतेने तपासाला सुरूवात केली. आरोपी मुंबई सीएसएमटीमध्ये असल्याचा तपास लावला. सांगली पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधत आरोपीला अटक केली.





