उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोटाचा कट उधळला; कुकर बॉम्बसह स्फोटकांचा साठा जप्त

लखनौ – उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने धडक कारवाई करत उत्तर प्रदेशमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला. पोलिसांनी अल कायदाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली.
त्यांच्याकडून दोन कुकर बॉम्ब, परदेशी पिस्तूल आणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. या दहशतवाद्यांचा अनेक ठिकाणी एकाचवेळी स्फोट घडवण्याचा कट होता.
अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, एटीएसने दहशतवादाचे एक मोड्यूूल उद्ध्वस्त केले आहे. अल कायदाच्या अन्सार घजवात उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत दोन हस्तकांना अटक करण्यात आली आहे.
दहशतवाद प्रतिबंदक पथकाने लखनौमध्ये दोन टिकाणी छापे टाकून हा कट उधळला. या ठिकाणी राहणाऱ्या सात व्यक्तींपैकी पाच जण घटनास्थळावरून पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी लखनौ आणि शेजारच्या जिल्ह्यात हाय ऍलट देण्यात आला आहे. बॉम्ब नाशक पथकाने जप्त केलेली स्फोटके आणि कुकरबॉम्ब निकामी केले. श्वानपथकाच्या मदतीने लपवलेली ही स्फोटके शोधून काढण्यात आली.
अटक केलेल्या दोघअंची ओळख पटली असून त्यांची नावे मसीरुद्दीन आणि मिन्हाज अशी आहेत. मिन्हाजचे वडील शिराज यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी एटीसने शोधमोहीम सुरू केली आहे.
आता उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम उत्तरप्रदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते.
उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. जिवंत बॉम्ब देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीर कनेक्शन आहे. हे स्लीपर सेल होते पण आता सक्रीय होऊन काम करत होते. आज किंवा उद्या लखनऊ व उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवणार होते. त्यांच्याकडून बऱ्याचप्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. यांनी एक मोठा कट रचला होता. अनेक दिवसांपासून ते याची तयारी करत होते. असे अनेकजण लपून बसलेले असू शकतात, त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
– जी. के. गोस्वामी, महानिरीक्षक, उत्तर प्रदेश एटीएस





