बॉलिवूडच्या ‘मस्तानी’च्या ऑस्कर सोहळ्यात मनमोहक अदा; दीपिकाच्या ग्लॅमर्स लूकवर खिळल्या सर्वांच्याच नजरा..!

Updated On:
Photo 1

नवी दिल्ली – ‘दीपिका पदुकोण’ ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असून, नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सची जोरदार चर्चा पाहायला मिळत असते. दरम्यान, नुकतंच पार पडलेल्या ‘ऑस्कर 2023’ मध्ये देखील दीपिका पदुकोण खास भूमिकेत दिसून आहे. दीपिकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या तिचा हा ग्लॅमर्स अंदाज सर्वांनाच आवडला असून, फॅन्स देखील अभिनेत्रीच्या प्रेमात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाचा ऑस्कर लुक लुई व्हिटॉनने डिझाईन केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले असून, #Oscars95 असं कॅप्शन लिहिलं आहे.

दरम्यान, ‘ऑस्कर 2023’च्या प्रेझेंटर्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीला हा मान मिळाला आहे. ‘ऑस्कर 2023’मध्ये दीपिकाने काळ्या रंगाचा क्लासी गाऊन परिधान केला आहे. दीपिकाच्या गाऊनला ऑपेरा ग्लोव्हजदेखील आहेत. मात्र, काळ्या गाऊनसह दीपिकाने हिऱ्यांचा नेकपीसदेखील घातला असून, यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास ठरला आहे. याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, यावेळी गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’ गाणं जबरदस्त परफॉर्मन्स देखील केलं.

आणखी संबंधित बातम्या

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Pankaj Tripathi : अनेक अडचणींचा केला सामना, पत्नीची लाभली खंबीर साथ; 'या' भूमिकांमुळे मिळाली ओळख, पंकज त्रिपाठीचा संघर्षकाळ

Pankaj Tripathi : अनेक अडचणींचा केला सामना, पत्नीची लाभली खंबीर साथ; 'या' भूमिकांमुळे मिळाली ओळख, पंकज त्रिपाठीचा संघर्षकाळ

Gandhari Movie Review: ‘गांधारी’मध्ये तापसीचा अॅक्शन अवतार भावला; पण आई-मुलीचं नातं मनाला भिडलं नाही

Gandhari Movie Review: ‘गांधारी’मध्ये तापसीचा अॅक्शन अवतार भावला; पण आई-मुलीचं नातं मनाला भिडलं नाही