Tabu Akshay Friendship : बॉलिवूडची जुनी मैत्री चर्चेत! अक्षय कुमार-तब्बू यांनी आठवणींना दिला उजाळा
Tabu Akshay Friendship : अक्षय कुमार आणि तब्बू यांची मैत्री आजही घट्ट आहे. भूत बंगला सिनेमाच्या ट्रेलर लॅान्चला दोघांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Tabu Akshay Friendship : बॉलिवूडमधील जुनी आणि घट्ट मैत्री म्हटली की तब्बू आणि अक्षय कुमार यांचे नाव आवर्जून घेतले जाते. तब्बल 39 वर्षांची त्यांची मैत्री पुन्हा चर्चेत आली आहे. दोघेही लवकरच ‘भूत बंगला’ या सिनेमात एकत्र दिसणार असून ट्रेलर लाँचदरम्यान दोघांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. Tabu Akshay Friendship
तब्बूने सांगितले की, इतक्या वर्षांनंतरही अक्षय कुमारचा दिनक्रम अजिबात बदललेला नाही. तो आजही पहाटे 4 वाजता उठतो, 5 वाजता जॉगिंगला जातो आणि फिटनेसबाबत अत्यंत शिस्तबद्ध आहे. काय खावे आणि काय टाळावे याबाबत तो मला नेहमी मार्गदर्शन करत असतो. Tabu Akshay Friendship
अक्षय कुमारनेही त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण सांगताना सांगितले की, ते दोघे एकत्र डान्स क्लासला जायचे आणि तो तब्बूला आपल्या बाईकवरून घेऊन जायचा. दोघांनीही जुन्या आठवणी सांगताना त्यांच्या मैत्रीतील सहजता आणि केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून आली. T
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या जोडीने यापूर्वी हेरा फेरी या सुपरहिट सिनेमात एकत्र काम केले होते. आता तब्बल 26 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Tabu Akshay Friendship : बॉलिवूडची जुनी मैत्री चर्चेत! अक्षय कुमार-तब्बू यांनी आठवणींना दिला उजाळा
भूत बंगला ( Bhooth Bangla) हा हॉरर-कॉमेडी प्रकारातील सिनेमा असून यात अक्षय कुमार एका झपाटलेल्या बंगल्याची विक्री करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. कथेत अनेक रहस्यमय आणि मनोरंजक वळणे आहेत. Tabu Akshay Friendship
या सिनेमात परेश रावल, राजपाल यादव, गोवर्धन असरानी आणि वामिका गब्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 17 एप्रिल रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. Tabu Akshay Friendship





