\n

हॉलिवूड चित्रपटासाठी जानेवारी २०२७ मध्ये शूटिंग

\n

शरद कपूर यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांना एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली असून जानेवारी २०२७ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट त्यांच्या हॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा ठरणार आहे. मात्र, या चित्रपटाचं नाव आणि इतर कलाकारांबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

\n

शरद कपूर यांनी मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही माहिती दिली. ते गेल्या सात वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास होते. साधारण वर्षभरापूर्वी ते भारतात परतले. त्यामुळे भारतीय मनोरंजनविश्वात पुन्हा स्वतःसाठी कामाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागत होते.

\n

काम मागण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. माझ्या इंडस्ट्रीतील लोक माझं कुटुंब आहेत. मला आर्थिक मदतीची गरज नाही, तर पुन्हा चांगल्या भूमिका साकारण्याची संधी हवी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

\n

शरद कपूर यांच्या कामापासून दूर राहण्यामागे त्यांच्या पायाला झालेली दुखापत हेही एक महत्त्वाचं कारण आहे. बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळत असताना दुसऱ्या खेळाडूचा पाय त्यांच्या पायाला लागला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

\n

दुखापतीमुळे त्यांना स्वतःची दैनंदिन कामं करणंही कठीण झालं. त्यांच्या घरी चार पाळीव कुत्रे आहेत. मात्र, त्यांना बाहेर फिरायला नेणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं शक्य होत नसल्याने त्यांनी काही काळासाठी या कुत्र्यांना अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्याचा त्यांचा विचार आहे.

\n

याशिवाय, आपल्या पाळीव कुत्र्यांना अधिक चांगली जागा मिळावी यासाठी त्यांनी मुंबईतील सध्याचं घर विकून मड आयलंड परिसरातील सात बेडरूमच्या मोठ्या बंगल्यात राहायला जाण्याची योजना आखली आहे. या बंगल्यासाठी त्यांनी आगाऊ रक्कमही दिल्याचं मुलाखतीत सांगितलं.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Sharad Kapoor : ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; मिळाली थेट हॉलिवूड सिनेमाची ऑफर, दोन दिवसांपूर्वी झाला होता VIDEO व्हायरल….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/DD-2026-11-13T222440.015.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/DD-2026-11-13T222440.015.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film#webpage","name":"Sharad Kapoor : ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; मिळाली थेट हॉलिवूड सिनेमाची ऑफर, दोन दिवसांपूर्वी झाला होता VIDEO व्हायरल….","url":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film","inLanguage":"mr","description":"कामाच्या शोधात असलेल्या शरद यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत थेट सिनेसृष्टीतील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांकडे काम देण्याची विनंती केली होती.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/DD-2026-11-13T222440.015.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywoodnews-josh-fame-sharad-kapoors-fortunes-have-taken-a-turn-he-has-received-an-offer-for-a-hollywood-film","name":"Sharad Kapoor : ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; मिळाली थेट हॉलिवूड सिनेमाची ऑफर, दोन दिवसांपूर्वी झाला होता VIDEO व्हायरल…."}}]}}}

Sharad Kapoor : ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; मिळाली थेट हॉलिवूड सिनेमाची ऑफर, दोन दिवसांपूर्वी झाला होता VIDEO व्हायरल….

Sharad Kapoor : ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; मिळाली थेट हॉलिवूड सिनेमाची ऑफर, दोन दिवसांपूर्वी झाला होता VIDEO व्हायरल…. - Dainik Prabhat