‘औरों में कहां था दम’ दिसणार अजय देवगण – तब्बूची केमेस्ट्री

Bollywood । अभिनेता अजय देवगण आणि तब्बूच्या जोडीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची जोडी ऑनस्क्रीन चाहत्यांना खूप आवडते. आता अजय आणि तब्बू लवकरच ‘और में कहां था दम’मध्ये दिसणार आहे. या रोमँटिक संगीतमय चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. आज या चित्रपटाची पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
‘और में कहाँ दम था’ चा टीझर रिलीज झाला आहे बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर आज अजय देवगण आणि तब्बू स्टारर आगामी ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही उघड केली आहे. हा रोमँटिक ड्रामा 5 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. होळीच्या सणादरम्यान अजय देवगण आणि तब्बू एकमेकांना मिठी मारताना व्हिडिओची सुरुवात होते. व्हिडिओच्या पार्श्वभूमीतून अजय देवगण दमदार डायलॉग बोलत आहे.
‘और में कौन दम था’ स्टार कास्टबाबत सांगायचे झाल्यास, अजय देवगण-तब्बूशिवाय व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा मूळ साउंडट्रॅक प्रसिद्ध संगीतकार एम.एम. करीम यांनी संगीतबद्ध केला आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग मुंबईतच झाले आहे.
=========================





