6 जानेवारीला लग्न अन् 23 सप्टेंबरला दिला गोड मुलीला जन्म; स्वरा भास्करने मुलीचं नावही ठेवलं…

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (actress swara bhaskar) आई बनली असून अभिनेत्रीने 23 सप्टेंबरला एका गोड मुलीला जन्म दिला आहे. राबिया असे स्वराने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे. ही आनंदाची बातमी तिने आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुलीचा फोटोही पहायला मिळत आहे.
“एक प्रार्थना पूर्ण झाली आणि आम्हाला एक आशीर्वाद मिळाला. कधीकधी तुमच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतात. आमच्या मुलीचा म्हणजेच राबियाचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. आम्ही कृतज्ञ आहोत…तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद!” अशी पोस्ट स्वरा भास्करने केली आहे. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, यावर्षी 6 जानेवारी रोजी अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांचा विवाह झाला होता. एक महिन्यानंतर लग्नाचे फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा आणि अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.
View this post on Instagram





