Bollywood: शाहिद अन् करीना समोरासमोर; सोहळ्यातील व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bollywood: दादासाहेब फाळके अवॉर्ड्स सोहळा २० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. या सोहळ्यात शाहरुख खान, आदित्य कपूर, अॅटली, करीना कपूर व शाहिद कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यातील अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता शाहिद कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी या दोघांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा समोरासमोर आली आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूर दिसत आहेत. शाहिद कपूर रेड कार्पेटवर उभा असतो त्याच्यासोबत काही व्यक्ती देखील उभी असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तिथे करीना कपूर येते आणि त्याच्यासमोरून जाते. या व्हिडीओमध्ये करीना ही शाहिदला इग्नोर करताना दिसत आहे. ती त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला भेटते आणि तिथून निघून जाते. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
शाहिद आणि करीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. “जर हे दोघे कपल असले असते तर ही बॉलिवूडमधील बेस्ट जोडी असती.” दरम्यान, करीना आणि शाहिद 2007 मध्ये एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपला 15 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर करीनानं 2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता शाहिद आणि करीनाचा व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा दोघे चर्चेत आले आहेत.




