Shruti Haasan: ‘पेड्डी’मध्ये श्रुती हासनचा धमाकेदार डान्स; फक्त ४ दिवसांसाठी ३ कोटींची फी चर्चेत!
Shruti Haasan मिळालेल्या माहितीनुसार, ‘पेड्डी’मधील हा डान्स खूप भव्य पद्धतीने शूट करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये खास मोठा सेट उभारण्यात आला असून, या गाण्याच्या शूटिंगसाठी श्रुती हासनने ४ दिवस दिले. कमी कालावधीत शूट होणाऱ्या या गाण्यासाठी इतकी मोठी फी घेतल्यामुळेच सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे.

Shruti Haasan: दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण याचा आगामी ‘पेड्डी’ हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यातील एका खास गाण्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या गाण्यात श्रुती हासन (Shruti Haasan ) स्पेशल डान्स करताना दिसणार आहे. आणि त्यासाठी तिने तब्बल ३ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पेड्डी’ (Peddhi) मधील हा डान्स खूप भव्य पद्धतीने शूट करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये खास मोठा सेट उभारण्यात आला असून, या गाण्याच्या शूटिंगसाठी श्रुती हासनने ४ दिवस दिले. कमी कालावधीत शूट होणाऱ्या या गाण्यासाठी इतकी मोठी फी घेतल्यामुळेच सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे.
या गाण्याला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे संगीत. प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. त्यामुळे गाणं केवळ व्हिज्युअल्समुळेच नाही, तर संगीतामुळेही मोठं हिट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे. Shruti Haasan
राम चरण आणि श्रुती हासन ही जोडी याआधीही एकत्र झळकली आहे आणि त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘पेड्डी’मधील त्यांचा हा हाय-एनर्जी डान्स चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. Shruti Haasan

Peddi movie
चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिची निवड ही चिरंजीवी यांच्या शिफारशीवर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. Shruti Haasan
‘पेड्डी’ हा सिनेमा २५ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी अक्षय कुमार याचा ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा देखील रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळू शकते.
राम चरणचा मागील ‘गेम चेंजर’ हा सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालला नव्हता. त्यामुळे ‘पेड्डी’कडून त्याला आणि त्याच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता या भव्य गाण्यामुळे चित्रपटाला किती फायदा होतो आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





