Race 4 Film: ‘रेस 4’मधून सैफ अली खान आणि सलमान आऊट? ‘या’ अभिनेत्याची होणार वर्णी
Race 4 Film: रेश 4 च्या दिग्दर्शनाची धुरा विजय कृष्ण आचार्य यांच्यावर

Race 4 Film: ‘रेस’ चित्रपट या चित्रपट फ्रँचायझीचे आतापर्यंत ३ भाग आले आहेत आणि तिन्ही भागांना चाहत्यांची चांगली पसंती मिळाली आहे. पहिल्या दोन भागांमध्ये सैफ अली खानचा अभिनय पाहायला मिळाला होता आणि हे दोन्ही भाग यशस्वी ठरले होते.
तर चित्रपटाच्या तिसऱ्या भागात सलमान खान मुख्य भूमिकेत होता, पण या भागाला चाहत्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता चित्रपटाच्या चौथ्या भागाबद्दलही अपडेट येण्यास सुरुवात झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रेसच्या चौथ्या पार्टमध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची वर्णी लागली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमिर खानला या चित्रपटाची पटकथा आवडली असल्याचेही म्हंटले जात आहे. सध्या या चित्रपटाचं काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
या चित्रपटात आमिरसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषण केलेली नाही. Race 4 Film
रेश ४ च्या दिग्दर्शनाची धुरा विजय कृष्ण आचार्य यांच्यावर असून त्यांनी आमिरसोबत यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. जवळपास १३ वर्षांनी ते आमिरसोबत एकत्र काम करताना दिसणार आहेत. विजय कृष्ण आचार्य यांनी २०१३ मध्ये आमिरच्या ‘धूम ३’ चे दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर आता ‘रेस ४’ चित्रपटात नेमका काय बदल पाहायला मिळणार, याबाबतची उत्सुकता अनेकांना लागली आहे. Race 4 Film
हेही वाचा:






