Riteish Deshmukh : “कृपया मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांचं देणं लागतो,” रितेश देशमुख कोणाच्या शोधात?
Riteish Deshmukh : रितेशने पापाराझीचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख अभिनयासह त्याच्या साध्यासरळ स्वभावामुळे अनेकांची मनं जिंकून घेतो. याचदरम्या रितेशने एका व्यक्तीचा फोटो पोस्ट करत त्याचा नंबर मागितला. या व्यक्तीचे पैसे परत करण्यासाठी रितेशने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत त्याचा मोबाइल नंबर शोधण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली आहे. सध्या त्याच्या या कृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
खरं रितेश देशमुखनं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती पापाराझी आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसले. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना नेहमीप्रमाणे पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते. याचवेळी काही लहान मुलं रितेशजवळ आली आणि त्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले.
रितेशला त्या मुलांना मदत करायची होती, मात्र त्यावेळी त्याच्याकडे रोख पैसे नव्हते. आजकाल सर्वत्र डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रितेशने त्या मुलाला विचारलं, “तुझ्याकडे GPay आहे का?” त्याने नकारार्थी उत्तर देताच मग कसं देऊ?’असा सवाल रितेशने केला.
त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका पापाराझी फोटोग्राफरने स्वत:च्या खिशातून 100 रुपये काढून मुलाला देण्यासाठी रितेशला दिले. रितेशने “नाही नाही, नको..” असं म्हणत पापाराझीला विनंती केली, मात्र तरीही फोटोग्राफरने मदत करण्याचा निर्णय घेतला. Riteish Deshmukh
रितेशला या पापाराझीचे पैसे परत करायचे होते. त्याने त्याचा GPay नंबर मागण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी आणि घाईमुळे नंबर घेण्याऐवजी त्याने पापाराझीचा फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढून ठेवला. आता रितेशने त्याच पापाराझीचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.
‘”भाऊ, धन्यवाद! कृपया मला त्यांचा नंबर मिळवून द्या. त्यांनी माझ्यासाठी पैसे दिले आहेत. मी त्यांचं देणं लागतो. त्यांचा मोबाइल नंबर शोधण्यासाठी मदत करा’, अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे. रितेशने शंभर रुपयांची उधारी लक्षात ठेवून ती परत करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. Riteish Deshmukh
हेही वाचा :
CM Vijay: आंदोलनालाच मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा, विमानतळ प्रकल्प रद्द ; मोठा राजकीय निर्णय






