Prasad Oak: प्रसाद ओकची हिंदी इंडस्ट्रीत नवी इनिंग सुरू; नव्या चित्रपटाची घोषणा
Prasad Oak: 'सायबर-द बिगिनिंग' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आलोक नाईक यांच्यावर

Prasad Oak: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच त्याने ‘धर्मवीर’ या चित्रपटात साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका लक्षवेधी ठरली. या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शक म्हणूनही त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.
‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ यांसारख्या भव्य चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने यशस्वीपणे केले आहे. यानंतर आता प्रसाद ओक हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
नुकतेच त्याच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या फिल्मचं नाव ‘सायबर -द बिगिनिंग’ असं आहे. या घोषणेनंतर प्रसाद ओक याला एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
प्रसाद ओकच्या साथीला तगडी स्टारकास्ट
‘सायबर-द बिगिनिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक नाईक करत असून, राज झकेरियास यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक याच्यासोबत कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे.
यामध्ये झैन खान दुर्रानी, ‘तारे जमीन पर’ फेम दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहुल सिंग, आलीशा खान, आयुषी त्यागी, सौम्या श्रीवास्तव, अजित कोश्य आणि विठ्ठल काळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र या हिंदी चित्रपटात प्रसाद ओक नेमकी कोणती भूमिका साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :





