Prahaar Release date: राजकुमार रावच्या ‘प्रहार’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली ?
Prahaar Release date: प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा

Prahaar Release date: राजकुमार रावच्या आगामी ‘प्रहार’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हा सिनेमा ७ ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. मात्र आता प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. मॅडॉक फिल्म्सने आपल्या इतरही काही सिनेमांच्या बाबतीत हा निर्णय घेतला आहे.
अलिकडेच ‘प्रहार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. राजकुमार रावचा लूक, कोर्टरुम ड्रामाची झलक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच ७ ऑगस्ट ही रिलीज डेटही जाहीर करण्यात आली. मात्र आता रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे. परंतु याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, ऑगस्टचा पहिला आणि दुसरा आठवडा बॉक्स ऑफिसवर अनेक बड्या सिनेमांचा आहे. आधी तर हॉलिवूडचा ‘स्पायडरमॅन:ब्रँड न्यू डे’ रिलीज होत आहे. तर पुढील आठवड्यात ‘बटवारा १९४७’ आणि ‘आवारापन २’ रिलीज होणार आहेत. या मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेत त्याला अडकण्यापेक्षा या चित्रपटाला असा टाइम स्लॉट मिळायला हवा, जिथे चित्रपटाला मोकळेपणाने स्क्रीन्स आणि प्रेक्षक मिळू शकतील, असे म्हंटले जात आहे. Prahaar Release date
राजकुमार रावचा ‘प्रहार’ हा कोर्टरूम ड्रामा (Prahaar Release date)
अविनाश अरुण दिग्दर्शिक ‘प्रहार’ हा चित्रपट प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथानकात १९९३ चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला या प्रकरणांमधील कायदेशीर लढाई आणि कोर्टरूम ड्रामा जवळून दाखवला जाणार आहे.
वामिका गब्बीसुद्धा आहे चित्रपटाचा भाग (Prahaar Release date)
या चित्रपटात राजकुमार राव यांच्यासोबत वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाच्या दणकेबाज यशानंतर या दोघांचा एकत्र हा दुसरा चित्रपट आहे. Prahaar Release date
हेही वाचा:





