Akshay Kumar : ‘भूत बंगला’ चित्रपटाला यश अन् अक्षय कुमार रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?
Akshay Kumar :

Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी खास करुन ओळखला जातो. मात्र त्याच्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. अक्षय कुमार सध्या रुग्णालयात अॅडमिट असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमारच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षय कुमार केरळमध्ये चित्रपटाचे शुटिंग करत होता. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच ६ मे रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता अभिनेता बरा होत आहे.
अक्षय कुमार ब्रेकवर (Akshay Kumar)
मिडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारला डोळ्यांचा त्रास होत होता. ज्यामुळे त्याला ही शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ही एक नियमित प्रक्रिया होती, असं सांगितलं आहे.
शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आली आहे. सध्या अक्षय कुमार ब्रेकवर असून तो आराम करत आहे. यानंतर थोड्या दिवसांनी अक्षय कुमार पुन्हा एकदा शुटिंग सुरू करणार आहे.
दरम्यान, अक्षय कुमारच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु यामध्ये विद्या बालन आणि राशी खन्ना देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. Akshay Kumar
View this post on Instagram
अक्षयने नुकताच इंस्टाग्रामवर केरळ शेड्यूलबाबतचा अपडेट शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने सहकलाकारांसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना सेटची झलक दाखवली होती. या चित्रपटाद्वारे अक्षय आणि विद्या बालन यांना अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत.
अक्षय कुमारचा अलीकडेच प्रियदर्शनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘भूत बंगला’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याशिवाय तो वेलकम टू द जंगल, हैवान, गोलमाल ५, वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांमध्येही पाहायला मिळणार आहे. Akshay Kumar
हेही वाचा:





