Aryan Khan : किंग खानच्या लेकाचा मोठा राडा; ‘आर्यन खान’च्या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान याचा मुलगा 'आर्यन खान' सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Aryan Khan Video : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’ (Aryan Khan) सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो काही तरुणांशी राडा करताना दिसत असल्याने सुरुवातीला अनेकांना नेमकं काय घडलं, असा प्रश्न पडला. मात्र, या व्हिडीओमागची खरी गोष्ट समोर आल्यानंतर सगळा गैरसमज दूर झाला आहे. ( Aryan Khan)
हा व्हिडीओ प्रत्यक्षात एका लग्नसोहळ्यातील आहे. आपल्या जवळच्या मित्राच्या लग्नाला उपस्थित असताना आर्यन या मजेशीर प्रसंगात सहभागी झाला होता.
व्हिडीओमध्ये तो जीन्स, टी-शर्ट आणि ब्राऊन जॅकेट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसतो. सुरुवातीला तो हातात बूट घेऊन चालताना दिसतो, आणि काही क्षणातच त्या बुटांवरून इतरांसोबत खेळकर झटापट सुरू होते. Aryan Khan
पहिल्या नजरेत हा प्रसंग मारामारीसारखा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा लग्नातील पारंपरिक ‘जुता चुराई’चा भाग आहे. या रिवाजात नवरीकडील मंडळी नवरदेवाचे बूट चोरण्याचा प्रयत्न करतात, तर नवरदेवाचे मित्र ते वाचवण्याचा प्रयत्न करतात.
Aryan Khan 🔥💥
What is really happening here man 😭😂 pic.twitter.com/jz1uaP55bX
— POSITIVE FAN (@POSITIVEFANN) April 22, 2026
याच मजेदार खेळात आर्यन आपल्या मित्राचे बूट वाचवताना दिसतो, आणि बुटासाठीची ही खेळकर धावपळ एका छोट्या “युद्धा”त रूपांतरित होते.
आर्यन खान कोण आहे? (Aryan Khan )
आर्यन खान हा शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आहे. तो प्रामुख्याने फिल्ममेकिंग आणि बिझनेस क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने दिग्दर्शन आणि लेखन यामध्ये रस घेतला असून, स्वतःचा ‘Dyavol’ हा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँडही सुरू केला आहे.
Aryan Khan : किंग खानच्या लेकाचा मोठा राडा; ‘आर्यन खान’च्या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली
आर्यनने अभिनयापेक्षा कॅमेऱ्यामागे काम करण्याचा मार्ग निवडला आहे आणि भविष्यात तो दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे.





