Aishwarya Rai Bachchan : पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचा जलवा; ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर नवा अंदाज
Aishwarya Rai Bachchan : यंदाही ऐश्वर्याने आपल्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली

Aishwarya Rai Bachchan : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ यंदाही भारतीय कलाकारांच्या उपस्थितीने रंगला आहे. मात्र, चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ग्लॅमरस अंदाजाने… तिचा आणखी एक आता समोर आला आहे.
कान्समधील ऐश्वर्या रायचा तिसरा लुक समोर आला आहे, एका आकर्षक पांढऱ्या रंगाच्या पँटसूटमध्ये ती दिसून आली. या आउटफिटमध्ये फेदर आणि लेस डिटेलिंग करण्यात आली होती, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक अधिक रॉयल दिसत होता.Aishwarya Rai Bachchan
या पँटसूटसोबत तिने परिधान केलेला स्टायलिश ब्लेझर विशेष लक्षवेधी ठरला. ब्लेझरच्या लॅपल्सवर मौल्यवान रत्नांची नक्षी करण्यात आली होती. याशिवाय पंखांनी सजवलेल्या शानदार लुकला एक वेगळाच ग्लॅमरस टच मिळाला. यात तिचे सौंदर्य अधिक खुलले होते.
हा आकर्षक आउटफिट प्रसिद्ध चिनी डिझायनर Cheney Chan यांनी डिझाइन केला होता. ऐश्वर्याच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे हा लुक आणखी प्रभावी दिसत असल्याची चर्चा फॅशन वर्तुळात रंगली आहे.
याआधी कान्सच्या पहिल्या दिवशीही ऐश्वर्याचा लुक चर्चेचा विषय ठरला होता. त्या वेळी ती भारतीय फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेल्या जलपरी शैलीतील गाऊनमध्ये दिसली होती. तिच्या या लुकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
त्यानंतर ऐश्वर्याच्या आणखी एका पिंक गाऊन लुकचीही खूप चर्चा झाली. या वेळी तिच्यासोबत मुलगी आराध्या बच्चन देखील उपस्थित होती. आई-मुलीची ही जोडी रेड कार्पेटवर आकर्षणाचे केंद्र ठरली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी ऐश्वर्याच्या लुकची उत्सुकता असतेच. यंदाही तिने आपल्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. Aishwarya Rai Bachchan
हेही वाचा:







