‘त्या’ एका घटनेमुळे गोविंदाच्या करिअरला लागला ब्रेक; अजूनपर्यंत मोठ्या पडद्यापासून आहे दूर

90 च्या दशकांतील सुपरस्टार गोविंदाने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या अभिनयाने तो त्याच्या चाहत्यांना घायाळ करत होता. त्या दशकात त्याचे चाहते पण मोठ्या प्रमाणात होते. त्याचे चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर मोठी गर्दी व्हायची. एवढे सगळे असताना गोविंदाच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला आणि तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला आता ती घटना कोणती आहे? त्याबद्दल जाणून घेऊया…
गोविंदाने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आपलं बुडतं करिअर वाचवण्यासाठी गोविंदाने ‘रंगीला राजा’ हा चित्रपट केला. मात्र हाच चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निग पॉईंट ठरला आणि त्याचे करिअर संपले. या एका चित्रपटामुळे गोविंदाचं करिअर खराब झालं. ते असं डगमगलं की आजपर्यंत तो चित्रपटांपासून दूरच आहे.
‘रंगीला राजा’ 2019 मध्ये आलेला गोविंदाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप जोरात आपटला. या चित्रपटानंतर गोविंदा पुन्हा स्क्रिनवर दिसला नाही. ‘रंगीला राजा’ चित्रपटात गोविंदाने डबल रोलची भूमिका केली होती. हा चित्रपट रजनीकांतच्या netrikkan चा रिमेक होता. गोविंदाने रंगीला राजाच्या पहिले 2018 मध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ केला. मात्र नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकल्यात आली कारण सीबीएफसीचं प्रमाणपत्र या चित्रपटाला मिळालं नाही. यामुळे खूप गोंधळ उडाला होता. दरम्यान, ‘रंगीला राजा’ हा गोविंदाचा शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर गोविंदा रिॲलिटी शोमध्ये दिसत असतो मात्र मोठ्या पडद्यापासून तो दूर आहे.





