लग्नाच्या पाच वर्षानंतर दीपिका-रणवीरने शेअर केला,’वेडिंग वीडियो’

Bollywood : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीत हे जोडपे प्रसिद्ध आहे. दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न केले. या जोडप्याचा इटलीमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या जवळपास पाच वर्षानंतर या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे, जो येताच लोकप्रिय झाला. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली.
HD | deepika padukone and Ranveer Singh’s wedding glimpse 🧿❤️ pic.twitter.com/wMX4fgko4m
— Deepika Files (@FilesDeepika) October 25, 2023
दरम्यान, चित्रपट निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण शोचा 8वा सीझन OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. रणवीर सिंग-दीपिका पदुकोण या शोमध्ये पहिले पाहुणे असतील, जिथे करण दोघांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारणार आहे. या शोमध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा व्हिडिओही दाखवण्यात येणार आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला रणवीर सिंग सांगत आहे की, त्याने दीपिकाला कसे प्रपोज केले आणि त्यानंतर दोघांनी आपल्या आई-वडिलांशी कसे बोलले. हळद, मेहंदी आणि लग्नाची आणखी झलक व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघेही सात फेरे घेताना दिसत आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ खूपच सुंदर दिसत असून रणवीर-दीपिका खूप आनंदी दिसत आहेत. रणवीर या व्हिडिओत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच दोघेही सोशल मीडियावर चर्चेत आले.
काही काळापूर्वी कॉफी विथ करणचा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला होता, ज्यामध्ये रणवीर-दीपिका त्यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना दिसला. दोघांनी गुपचूप साखरपुडा केला का, असा प्रश्न करणने विचारला होता. यावर रणवीरने सांगितले की, त्याने दीपिकाला २०१५ मध्ये प्रपोज केले होते. तो गमतीने म्हणतो, “मी चप्पल दुसऱ्या कोणी ठेवण्यापूर्वी ठेवली.”





